दौलताबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे ५ हिंदूंना धर्मांधांकडून अमानुष मारहाण !

  • गोवंशियांच्‍या हत्‍येची माहिती दिल्‍याच्‍या संशयावरून मारहाण

  • दुचाकी जाळली, १५० जणांवर दंगलीचा गुन्‍हा नोंद !

दंगलीत जाळलेली दुचाकी

छत्रपती संभाजीनगर – जिल्‍ह्यातील दौलताबाद येथे हत्‍येसाठी गोवंश घेऊन जात असल्‍याची माहिती मिळाल्‍याने पोलिसांनी धर्मांधांवर कारवाई केली. या रागातून धर्मांधांच्‍या एका गटाने ५ हिंदु तरुणांना अमानुषपणे मारहाण करून त्‍यांची दुचाकी जाळली. (यातून धर्मांध येथील कायदे जुमानणार नसून हिंदूंवर अत्‍याचार चालूच ठेवणार आहेत, हे लक्षात येते ! – संपादक) दौलताबाद परिसरातील अब्‍दीमंडी भागात १७ जून या दिवशी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. त्‍यानंतर पोलीस ठाण्‍यासमोर मोठा जमाव जमल्‍याने तणावाचे वातावरण होते. घायाळ हिंदु तरुणांच्‍या तक्रारीवरून पोलिसांनी १०० ते १५० दंगलखोरांवर गुन्‍हा नोंद केला आहे. नरेश बळी, तुषार म्‍हस्‍के, भागवत वाघ, ज्ञानेश्‍वर फुके, अमोल बोराटे (सर्व रहाणार दौलताबाद) अशी घायाळ झालेल्‍या हिंदु तरुणांची नावे आहेत.

एका घरातील शटरमध्‍ये गोवंशियांची हत्‍या होत असल्‍याची माहिती मिळाल्‍याने पोलीस पथकाने घटनास्‍थळी जाऊन कारवाई केली. त्‍यावर ‘ईद’च्‍या दिवशीच कारवाई का करता ?’, असे म्‍हणत मुसलमानांच्‍या एका गटाने पोलीस ठाण्‍यासमोर मोठी गर्दी केली होती; मात्र पोलिसांनी समजूत काढून त्‍यांना परत पाठवले होते. याच वेळी काही हिंदु तरुण पोलिसांना गोवंशियांविषयी माहिती देत असल्‍याची चर्चा चालू झाली. हे हिंदु तरुण नागेश्‍वर मंदिरात असल्‍याची माहिती मिळताच धर्मांधांचा एक गट तिकडे जाऊन ५ हिंदु तरुणांना अमानुषपणे मारहाण करून त्‍यांची दुचाकी जाळली. या मारहाणीची माहिती कळताच दौलताबाद पोलीस घटनास्‍थळी गेले. त्‍यांनी हिंदु तरुणांना जमावाच्‍या तावडीतून वाचवले.

दौलताबाद पोलीस ठाण्‍यातील साहाय्‍यक पोलीस फौजदार रामसेवक जितबहादूर गुरूम यांच्‍या तक्रारीवरून आरोपी कलीम करीम खान (वय २९ वर्षे) याच्‍यावर महाराष्‍ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९९५ प्रमाणे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पोलिसांच्‍या धाडीत १४ सहस्र रुपयांचे ७० किलो मांस जप्‍त करण्‍यात आले आहे. (गोवंश हत्‍याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही पोलीस केव्‍हा करणार ? – संपादक)