बिहारमध्ये यापूर्वीही कोसळले आहेत पूल !
अररिया (बिहार) – येथील बाकरा नदीवर १२ कोटी रुपये खर्च करून बांधलेला नवीन पूल १८ जूनला कोसळला. या पुलाचे लवकरच उद्घाटन होणार होते; मात्र त्यापूर्वीच तो कोसळला. या पुलाचे ३ खांब नदीत बुडाले आणि पूल कोसळला. यानंतर पुलाचे बांधकाम करणारे आस्थापन आणि प्रशासन घटनास्थळी पोचले. जिल्ह्याच्या ग्रामीण बांधकाम विभागाने हा पूल बांधल्याचे येथील आमदार विजय मंडल यांनी सांगितले.
Bridge collapses In Araria, Bihar before inauguration.
The construction of the bridge, connecting two blocks, had resumed at a cost of Rs 12 crores.
There are several examples that the bridges constructed 100 years ago by the Britishers are still in good condition.
But the… pic.twitter.com/s6pWbZy1kK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 18, 2024
बिहारमध्ये पूल कोसळल्याच्या घडलेल्या घटना
१. जून २०२३ मध्ये सुलतानगंजमध्ये गंगा नदीवर बांधण्यात येणारा पूल कोसळला होता. या पुलाच्या बांधकामासाठी १ सहस्र ७०० कोटी रुपये लागले. येथे पूर्वी असलेला पूल वर्ष २०२२ मध्ये कोसळला होता.
२. मार्च २०२४ मध्ये सुपौल येथील कोसी नदीवर बांधण्यात येणार्या पुलाचा स्लॅब कोसळला होता. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला होता.
संपादकीय भूमिकाइंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेले पूल १०० वर्षांहून अधिक काळ टिकले आहेत; मात्र भारतियांनी स्वातंत्र्यानंतर बांधलेले पूल काही वर्षे सोडचा, उलट उद्घाटनापूर्वीच कोसळतात, हे लज्जास्पद ! |