Indian Fishermen : श्रीलंकेच्या नौदलाने ४ भारतीय मासेमारांना पकडले !

चेन्नई – श्रीलंकेच्या नौदलाने तमिळनाडूतील पुदुकोट्टई येथील ४ भारतीय मासेमारांना डेल्फ्ट बेटावर मासेमारी करतांना पकडले.

पार्थिवन, के. सारथी, के. मुरली आणि एन. रामदास, अशी त्यांची नावे आहेत. नौदलाने त्यांच्याकडून एक नाव (बोट) जप्त केली आहे.