वाळपई येथे उघडपणे गोवंशियांची चोरी

दुचाकीवरून मुसलमान वासराला नेत असून मागून गाय धावत जात आहे.

वाळपई – येथील हातीकडे येथे एका स्कूटरवर १५ जूनच्या रात्री एक मुसलमान दुचाकीच्या पाठीमागे वासराला घेऊन जात होता, तर गाय त्या दुचाकीच्या पाठीमागे धावत होती, असे चित्र पहायला मिळाले. आदल्याच दिवशी म्हणजे १४ जूनला सत्तरी तालुक्यातील वेळगे येथून गुरांना चोरून नेण्याचा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला होता. १५ जूनला वासराला घेऊन जातांना एका वाहनचालकाने हे दृश्य भ्रमणभाषवर चित्रीत करून ते प्रसारित केले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून नाणूस येथील नूर महंमद अन्सारी आणि त्याचा मुलगा ओसामा महंमद अन्सारी यांना कह्यात घेतले आहे. वासरू आणि गाय यांना नाणूस येथील अखिल विश्व जय श्रीराम गोसंवर्धन केंद्राकडे सुपुर्द करण्यात आले आहे.

अन्य एका घटनेत वाळपई पोलिसांनी मेहबूब सुभानी या बेळगाव येथील २९ वर्षीय व्यक्तीला अवैधरित्या २ सहस्र ९२० किलो गोमांसाची वाहतूक केल्याच्या प्रकरणी अटक केली आहे. या गोमांसाची किंमत बाजारात ६ लाख रुपये आहे.