साधना न करणारी समाजातील व्‍यक्‍ती आणि सनातनच्‍या नाशिक येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या साधिका (कै.) सौ. स्नेहल दिवाकर शेरीकर यांच्‍या अंत्‍यदर्शनाच्‍या वेळी साधकाने केलेला तौलनिक अभ्‍यास !

६.६.२०२४ या दिवशी नाशिक येथील सौ. स्नेहल दिवाकर शेरीकर (वय ६४ वर्षे) यांचे निधन झाले. १८.६.२०२४ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा तेरावा दिवस आहे.

(कै.) सौ. स्नेहल दिवाकर शेरीकर

‘७.६.२०२४ या दिवशी मी (कै.) सौ. स्नेहल शेरीकर यांच्‍या अंत्‍यदर्शनासाठी त्‍यांच्‍या घरी गेलो होतो. त्‍याच दिवशी मी समाजातील साधना न करणार्‍या एका व्‍यक्‍तीच्‍या अंत्‍यदर्शनासाठी तिच्‍याही घरी गेलो होतो. त्‍या वेळी मला जाणवलेली तुलनात्‍मक सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. नीलेश नागरे

वरील तुलनात्‍मक अभ्‍यास केल्‍यावर साधना करण्‍याचे महत्त्व माझ्‍या मनावर बिंबले. ‘साधना करणार्‍या प्रत्‍येक जिवावर गुरुकृपा असते आणि ‘साधकांच्‍या मृत्‍यूनंतरही साधकाची पुढील साधना कशी होईल ?’, याची काळजी गुरुतत्त्व घेत असते’, याची अनुभूती येऊन माझी भावजागृती झाली, तसेच माझ्‍याकडून प.पू. गुरुदेव अन् भगवान श्रीकृष्‍ण यांच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.’

– श्री. नीलेश नागरे (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ४३ वर्षेे), नाशिक (७.६.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक