मंडला (मध्यप्रदेश) येथील गावामधून १५० गायींची सुटका

  • बकरी ईदपूर्वी कारवाई

  • गोमांस सापडलेली ११ बेकायदेशीर घरे पाडली !

प्रतीकात्मक छायाचित्र

मंडला (मध्यप्रदेश) – येथील भैसवाही गावात प्रशासनाने धाड घालून १५० गायींची सुटका केली. या गायींना गोतस्करी करून गोहत्येसाठी आणण्यात आले होते. तसेच येथील ११ घरांमधून गोमांसही जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने बुलडोझरद्वारे ही सर्व बेकायदेशीर ११ घरे पाडून टाकली. ही घरे सरकारी भूमीवर बांधण्यात आली होती. (हे प्रशासनाला आधी ठाऊक नव्हते का ? प्रशासन घरे बांधली जाईपर्यंत झोपले होते का ? – संपादक)

या संपूर्ण प्रकरणात एकूण ११ गुन्हे नोंदवण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली, तर उर्वरित पळून गेले. या गावात यापूर्वीही कारवाई करण्यात आली होती; मात्र इतकी मोठी कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • बकरी ईदच्या वेळी बकर्‍याचा बळी दिला जात असतांना गोहत्या का केली जाते ? याचे उत्तर मुसलमानांचे धार्मिक नेते, राजकीय नेते का देत नाहीत ?