‘सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी आणि सनातनच्या ११३ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी यांच्यातील भावपूर्ण संवाद ऐकून सौ. मानसी राजंदेकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ‘पू. दातेआजी आणि पू. दीक्षितआजी एकमेकींशी बोलत असतांना ‘एका वेगळ्याच लोकातील संवाद आहे’, असे वातावरण खोलीत निर्माण होणे
‘१६.१२.२०२३ या दिवशी पू. निर्मला दातेआजी आणि पू. विजया दीक्षितआजी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील त्यांच्या खोलीत बोलत होत्या. पू. दातेआजी आणि पू. दीक्षितआजी या दोघींची चांगली मैत्री आहे. त्या खर्या अर्थाने आध्यात्मिक मैत्रिणी आहेत. त्या क्षणी असे वाटले की, ‘या दोन गोड अद्वितीय संतांमधील संवाद ऐकण्याचा मोह देवालाही आवरता येणार नाही’, असाच आहे.’ त्या दोघी एकमेकींशी बोलत असतांना ‘एका वेगळ्याच लोकातील संवाद आहे’, असे वातावरण खोलीत निर्माण झाले होते.
२. संतद्वयींमधील भावरूपी संवाद
त्या दोघी एकमेकींना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या विषयीच्या आपापल्या अनुभूती सांगत होत्या. तसेच ‘आता सतत नामजप करत रहायचे. नामजप आपोआपच कसा चालू रहातो आणि ही सर्व गुरुदेवांची कृपा आहे’, असेच सारखे म्हणत होत्या.
‘पू. दातेआजी आणि पू. दीक्षितआजी यांचे छायाचित्र बघून आनंदाची स्पंदने जाणवतात.’ – सौ. ज्योती दाते (पू. दातेआजींची मोठी सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३. संतद्वयींच्या भावविश्वात हरवून जाणे
त्या बोलत असतांना त्यांच्या चेहर्यावरील प.पू. गुरुदेवांप्रतीचा उत्कटभाव त्यांच्यातील निरागसता आणि निर्मळता यांचीच अनुभूती देणारा होता. त्या वेळी खोलीत मी आणि सौ. ज्योती दातेकाकू (पू. दातेआजींची मोठी सून)(आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६० वर्षे) या संतद्वयींच्या भावविश्वात हरवून गेलो अन् आमच्या डोळ्यांतून कधी भावाश्रू आले, ते आम्हालाच कळले नाही.
४. व्यावहारिक आणि सांसारिक जीवनाचा समृद्ध अन् प्रदीर्घ अनुभव आणि अध्यात्मातही संत पदावर आरूढ असणे, या जीवनातील दोन्ही टप्प्यांवर यशस्वी असणे, हे या दोन्ही अद्वितीय संतांचे एक वैशिष्ट्यच आहे.
५. पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी आणि पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचे छायाचित्र पाहून जाणवलेली सूत्रे
हे छायाचित्र माझ्याकडून आपोआपच काढले गेले. ‘ते देवाचेच नियोजन होते’, असे मला जाणवते. छायाचित्रातून प्रीती आणि आनंद यांची स्पंदने जाणवतात. त्यांच्या साड्यांचे रंगही त्यांच्या ‘आध्यात्मिक स्थितीचे दर्शन घडवणारे आहेत’, असे मला जाणवले. पू. दातेआजी यांनी आकाशी निळ्या रंगाची साडी नेसली आहे. ती निर्गुणतत्त्वाचे (भावाचे) प्रतीक आहे, तर पू. दीक्षितआजी यांनी केशरी रंगाची साडी नेसली आहे. ते वैराग्याचे (भक्तीचे) प्रतीक आहे. त्याच समवेत प.पू. गुरुदेवांचे ‘सगुण रूप (पू. दीक्षितआजी) आणि निर्गुणरूप (पू. दातेआजी) एकत्र आले आहे’, असे मला जाणवले.
‘प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला असे आयुष्यभर कृतज्ञताभावात ठेवतील’, असे अनमोल क्षण अनुभवता आले’, यासाठी प.पू. गुरुदेव, पू. दातेआजी आणि पू. दीक्षितआजी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के,वय ४० वर्षे), फोंडा, गोवा. (१०.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |