अग्रवाल दांपत्यासह तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

अग्रवाल दांपत्य

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अग्रवाल, त्याची आई शिवानी यांच्यासह आरोपी मकानदार यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांनी १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार न्यायालयाने तिघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्याचे आदेश दिले. अग्रवाल दांपत्यासह मकानदार यांच्या पोलीस कोठडीची मुदत १४ जून या दिवशी संपली. त्यानंतर तिघांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. तपासासाठी आरोपी मकानदार याला ३ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी आणि अग्रवाल दांपत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवावे, अशी विनंती साहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांनी केली होती.