सातारा, १४ जून (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून ‘कास धरण उद्भव’ योजनेतून सातारा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मंगळवार पेठ, रामाचा गोट, चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, यादोगोपाळ पेठ, तसेच डोंगर भागातील माची पेठ या भागाचा यामध्ये समावेश आहे. या भागातील नागरिकांना कळवण्यात येते की, कास माध्यमातून येणारे पाणी पावसामुळे गढूळ आणि माती मिश्रित येत आहे. या स्थितीत नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून, गाळून उपयोगात आणावे आणि सातारा नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केले आहे.