Pema Khandu : पेमा खांडू सलग तिसर्‍यांदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान !

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू

इटानगर (अरुणाचल प्रदेश) – भाजपचे नेते पेमा खांडू यांनी १३ जून या दिवशी सलग तिसर्‍यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चाऊना मीन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याखेरीज १० मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यामध्ये बिऊराम वाघा, न्यातो दुकम, गानरील डेनवांग वांगसू, वांकी लोवांग, पासांग दोरजी सोना, मामा न्तुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओझिंग तासिंग यांचा समावेश आहे.

इटानगर येथील दोरजी खांडू कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा सहभागी झाले होते.