दक्षिण कोरियाच्या सैन्याने केलेल्या गोळीबारानंतर परतले !
प्योंगयांग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाच्या सैनिकांनी सीमा ओलांडून दक्षिण कोरियाच्या भूमीत प्रवेश केल्यावर दक्षिण कोरियाच्या सैन्याने गोळीबार करत त्यांना माघारी जाण्याची चेतावणी दिली. ही घटना ९ जूनच्या दुपारी घडली. त्याचा तपशील आता समोर आला आहे. गोळीबारानंतर उत्तर कोरियाचे सैनिक त्यांच्या देशात परतले. अद्याप या प्रकरणी उत्तर कोरियाकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
१. दक्षिण कोरियाच्या सैन्याचे अधिकारी म्हणाले की, उत्तर कोरियाच्या सैनिकांकडे बांधकामाची साधने होती. काहींकडे शस्त्रेही होती. ते दक्षिण कोरियाच्या सीमेच्या ५० मीटरच्या आत आले होते.
२. आकडेवारीनुसार सीमेवर आणि आजूबाजूला २० लाख खंदके आहेत. याखेरिज काटेरी तारांचे कुंपण, रणगाडे आणि लढाऊ सैनिकही सीमेच्या दोन्ही बाजूला तैनात आहेत. वर्ष १९५० ते १९५३ पर्यंत चाललेले या दोन्ही देशांतील युद्ध संपवण्यासाठी करारच्या अंतर्गत ही सीमा निर्माण करण्यात आली होती.
३. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरिया सातत्याने दक्षिण कोरियाला मोठ्या फुग्यांमध्ये कचरा भरून पाठवत आहे. त्यामुळे दक्षिण कोरियातील अनेक रस्त्यांवर कचरा साचला आहे.