Canada’s Secret Visit To India :  कॅनडाच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी भारताला दिली गुप्तपणे भेट !

खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर हत्या

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा यांचे संबंध चांगले राहिलेले नाहीत. भारत आणि कॅनडा संबंधांमध्ये तणाव असतांना कॅनडाच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख डेव्हिड विग्नॉल्ट यांनी या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च मासांमध्ये भारताला गुप्तपणे भेट दिली.

डेव्हिड विग्नॉल्ट

‘निज्जरच्या हत्येशी संबंधित प्रकरणाची माहिती भारतीय अधिकार्‍यांना देणे, हा डेव्हिड विग्नॉल्ट यांच्या या भेटीचा उद्देश होता’, असे कॅनडाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

कॅनडाच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाने केलेल्या अन्वेषणाची माहिती भारतीय अधिकार्‍यांना पुरवली. तथापि कॅनडाच्या अधिकार्‍यांनी विग्नॉल्ट यांनी भारत भेटीच्या वेळी अधिकार्‍यांशी काय चर्चा केली ? याविषयी माहिती देण्यास नकार दिला.
१८ जून २०२३ या दिवशी हरदीप सिंह निज्जर याची ब्रिटीश कोलंबियातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. निज्जरच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ४ भारतीय नागरिकांना अटक केली आहे.