BJP Lost Ayodhya : अयोध्येत चुकीचा उमेदवार निवडल्याने भाजपचा पराभव !

पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांचा दावा !

बेळगाव – उत्तरप्रदेशातील अयोध्या लोकसभा मतदारसंघात चुकीचा उमेदवार  निवडल्यामुळे भाजपचा पराभव झाला आहे, असा दावा पेजावर मठाचे विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केला. स्वामीजी पुढे म्हणाले की, अयोध्येतील श्रीराममंदिरानंतर वाराणसीतील श्री काशी विश्‍वनाथ देवालय आणि मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी यांची प्रक्रिया कायद्याप्रमाणेच होईल.

विश्‍वप्रसन्न तीर्थ स्वामीजी

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने मंदिरांचे सरकारीकरण करणे अयोग्य !

मंदिर सरकारीकरणाविषयी स्वामीजी म्हणाले की, राज्यशासनाने हिंदु धार्मिक केंद्र, मठ आणि मंदिर यांना सरकारच्या अंतर्गत आणण्यासाठी पुढे सरसावणे योग्य नाही. सर्व लक्षात ठेवून काम केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.