Bharat Gaurav Award : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अद्वितीय कार्याचा फ्रान्सच्या संसदेत ‘भारत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान !

  • फ्रान्सच्या संसदेमध्ये भव्य सोहळा !

  • श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी स्वीकारला पुरस्कार !

पुरस्कार स्वीकारतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ. पुरस्कार प्रदान करतांना डावीकडून फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॉमिनिक थिओफिल, मेहेंदीपूर बालाजी ट्रस्टचे श्री नरेश पुरी महाराज, ‘संस्कृती युवा संस्थे’चे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा आणि फ्रेंच संसदेचे सदस्य फ्रेडरिक बुवेल

पॅरिस, ८ जून (वार्ता.) : अध्यात्माच्या मार्गाने जीवन जगणार्‍या जिवांसाठी ज्ञानगुरु, धर्मगुरु आणि मोक्षगुरु असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे कार्य महर्षि, उच्च कोटीचे संत, तसेच आध्यात्मिक संस्था यांनी गौरवले आहे. आता त्यांच्या विश्वकल्याणकारी कार्याची नोंद जागतिक स्तरावरही घेण्यात येत आहे. ५ जून २०२४ या दिवशी फ्रान्सच्या सीनेटमध्ये (संसदेमध्ये) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ११ व्या ‘भारत गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

कला, संस्कृती, क्रीडा, अध्यात्म आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांना हा जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. संस्कृती युवा संस्थेकडून देण्यात येणारा हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतियांसाठीचा हा सर्वाेच्च पुरस्कार आहे. भारतीय संस्कृतीच्या जागतिक प्रसारासाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ‘संस्कृती युवा संस्थे’ने या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची निवड केली होती. या भव्य सोहळ्यात संस्कृती युवा संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांच्यासह जगभरातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा शाल देऊन सत्कार करतांना फ्रेंच संसदेचे उपाध्यक्ष डॉमिनिक थिओफिल

पं. सुरेश मिश्रा, अध्यक्ष, संस्कृती युवा संस्था.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी भारतीय संस्कृतीसाठी दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सनातन संस्थेने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजात जागरूकता अन् सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
– पं. सुरेश मिश्रा, अध्यक्ष, संस्कृती युवा संस्था.

हा पुरस्कार म्हणजे आदिशक्तीचा आशीर्वाद !

श्री. विनायक शानभाग

फ्रान्स देशाच्या राजधानीला ‘पॅरिस’ हे नाव खरेतर आदिशक्तीचे रूप असलेल्या परमेश्‍वरीदेवीच्या नावापासून लाभले आहे. रोमन सभ्यतेच्या (संस्कृतीच्या) वेळी पॅरिस शहराला ‘पॅरिशोरियम्’ असे संबोधले जायचे. खरेतर हे नाव ‘परमेश्‍वरी’ या देवीच्या नावाचा अपभ्रंश आहे; कारण पॅरिस हे प्राचीन काळात परमेश्‍वरीदेवीचे स्थान होते. आज विदेशी भूमीवर आणि तेही आदिशक्तीचे स्थान असलेल्या फ्रान्सच्या सीनेटमध्ये झालेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा गौरव, हा एकप्रकारे परमेश्‍वरीदेवीचा आशीर्वादच आहे.

काही वर्षांपूर्वी नाडीपट्टीच्या माध्यमातून महर्षी म्हणाले होते की, सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कीर्ती जगभर होईल. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ‘संस्कृती युवा संस्थे’च्या वतीने गुरुदेवांना जो भारत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्यातून महर्षींच्या त्या वाक्याची प्रचीती आली.
– श्री. विनायक शानभाग, पॅरिस, फ्रान्स.

संस्कृती युवा संस्थेचे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा यांची थोडक्यात माहिती

पं. सुरेश मिश्रा

पं. सुरेश मिश्रा हे राजस्थानमधील जयपूर येथील निवासी आहेत. ते सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये सक्रीय असल्यामुळे जयपूरमधील अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळावी, यासाठी त्यांना तळमळ आहे. ‘संस्कृती युवा संस्था’ या संघटनेची स्थापनाही त्याच उद्देशाने झाली आहे. यासाठी ही संस्था जगभरातील विविध महनीय व्यक्तींच्या सहकार्याने कार्य करत आहे. या संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.


संस्कृती युवा संस्थेविषयी थोडेसे …

‘संस्कृती युवा संस्था’ ही मागील ३० वर्षे भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अन् सन्मान मिळण्यासाठी काम करत आहे. यासाठी ही संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करते. हे कार्य अधिक गतीने होण्यासाठी या संस्थेने जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांत भरीव कामगिरी करणार्‍या महनीय व्यक्तीसमवेत मिळून काम केले आहे.


‘भारत गौरव’ पुरस्काराने सन्मानित केलेले मान्यवर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासह ३५ जणांना ‘भारत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . . .

त्यामध्ये ‘हार्टफूलनेस’चे आध्यात्मिक गुरु कमलेश (दाजी) पटेल, आध्यात्मिक गुरु सद्गुरु श्री रितेश्वर महाराज, ब्रिटनमधील आध्यात्मिक गुरु एच्.एच्. श्री राजराजेश्वर गुरुजी, ‘आस्था’ दूरचित्रवाहिनीचे संस्थापक डॉ. संतोष कुमार जैन, ‘संस्कार टीव्ही’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज त्यागी, अयोध्येतील श्री रामलल्लाची मूर्ती बनवणारे भारताचे सुप्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज, श्री रामलल्लाचा पोशाख बनवणारे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष त्रिपाठी आणि ‘एबीपी न्यूज’चे कार्यकारी संचालक इंद्रजीत राय यांचाही समावेश आहे.

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक –

‘भारत गौरव’ पुरस्काराने सन्मान हा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य कार्याचा सन्मान !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना फ्रान्सच्या सिनेटमध्ये ‘भारत गौरव’ पुरस्काराने सन्मानित केल्याविषयी सनातन संस्था ही ‘संस्कृती युवा संस्था’ आणि संस्थेचे अध्यक्ष पं. सुरेश मिश्रा यांच्याप्रती कृतज्ञ आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासम उच्च पातळीचे संत हे पुरस्कार आणि मानसन्मान यांच्या पलीकडे गेलेले असले, तरी त्यांचा झालेला हा सन्मान म्हणजे त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ केलेल्या दिव्य अध्यात्मकार्याचा सन्मान आहे.

‘भारत गौरव’ पुरस्कारासहित डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

हा सन्मान म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन धर्मातील अध्यात्माला ‘शास्त्र’ म्हणजेच ‘विज्ञान’ म्हणून स्थापित करण्यासाठी केलेले अलौकिक संशोधनकार्य आणि ग्रंथलेखन, तसेच अखिल मानवजातीला शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेला ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग यांचाच आज एकप्रकारे गौरव झाला आहे, असे आम्ही मानतो.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी