Bharat Gaurav Award : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना घोषित झाला ११ वा ‘भारत गौरव पुरस्कार !’

‘संस्कृती युवा संस्थे’च्या वतीने ५ जूनला फ्रान्सच्या संसदेत होणार सम्मान !

जयपूर (राजस्थान) –  भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांच्या जागतिक प्रसारासाठी केलेल्या अद्वितीय योगदानासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना ११ व्या ‘भारत गौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले जाणार आहे. ‘संस्कृती युवा संस्थे’च्या वतीने ५ जून २०२४ या दिवशी फ्रान्समधील सिनेटमध्ये (संसदेत) हा पुरस्कार देण्यात येईल, असे संस्थेचे अध्यक्ष पंडित सुरेश मिश्रा यांनी घोषित केले आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या वतीने त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हा पुरस्कार स्वीकारतील.

भारतीय संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीसाठी अद्वितीय योगदानासाठी सन्मान !

२८ वर्षांपासून भारतीय संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित ‘संस्कृती युवा संस्थे’ने यंदाच्या प्रतिष्ठित ‘भारत गौरव पुरस्कारा’साठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची निवड केली आहे. हा पुरस्कार त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यांसाठी, आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आणि सांस्कृतिक संरक्षणातील अद्वितीय योगदानासाठी दिला जात आहे.

या महत्त्वपूर्ण प्रसंगी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना सन्मानित करण्यासाठी जागतिक स्तरावरील अनेक मान्यवर उपस्थित असतील आणि हा सोहळा भारतीय संस्कृतीच्या समृद्ध वारशाचा उत्सव साजरा करण्याचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ बनेल.

‘भारत गौरव पुरस्कार’ सोहळा या पूर्वी ‘युनायटेड किंगडम हाऊस ऑफ कॉमन्स’ (ब्रिटन), संयुक्त राष्ट्र्रे आणि अटलांटिस आणि दुबई, अशा प्रतिष्ठित ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या वेळी फ्रान्समधील सिनेटमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात भारत आणि भारतीय जनसमुहातील प्रतिष्ठित व्यक्तींना सन्मानित केले जाते, जे भारतीय संस्कृती आणि सभ्यतेच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.