तेल अविव – मालदीवमध्ये इस्रायलचे नागरिक जर कुठल्या संकटात सापडले, तर त्यांना साहाय्य करणे इस्रायलच्या सरकारला कठीण जाईल. त्यामुळे मालदीवमधील इस्रायली लोकांनी मालदीव सोडावे आणि दुसर्या देशात जावे, असे आवाहन इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने मालदीवमधील इस्रायली नागरिकांना केले. दैनिक ‘टाइम्स ऑफ इस्रायल’ने हे वृत्त प्रसारित केले आहे.
इस्रायलच्या नागरिकांना एकूण १३ देशांमध्ये प्रवेशबंदी !
मालदीवपूर्वीच अल्जेरिया, इराण, इराक, कुवेत, लेबनॉन, लिबिया, सौदी अरेबिया, सीरिया, येमेन, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रुनेई या देशांनीही इस्रायलच्या पारपत्रावर बंदी घालत इस्रायली नागरिकांना प्रवेशबंदी केली आहे.