नवी दिल्ली – मतदानोत्तर चाचणीत भाजपप्रणीत आघाडीला बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्यांसमवेत बैठक घेणार आहेत. सत्तेत येताच पहिल्या १०० दिवसांत काय करायचे आहे ?, याची सूची मोदी यांनी बनवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांतच अनेक मोठे निर्णय घेणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी अधिकार्यांना याची आधीच कल्पना दिली आहे. ‘ऑगस्ट २०२४ पर्यंत सरकार मोठे निर्णय घेईल’, असे मानले जात आहे. ४ जून या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे.
Instead of the first 100 days, now we will have an agenda for the 125 days, with 25 days being dedicated to our youth.
I would like to know their aspirations & take their suggestions
-PM Shri @narendramodi pic.twitter.com/Z9WjJVdDuM
— G Kishan Reddy (Modi Ka Parivar) (@kishanreddybjp) May 16, 2024
१. नवीन सरकारच्या स्थापनेनंतर पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी.के. मिश्रा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची प्रथम नियुक्ती केली जाऊ शकते. नवीन सैन्यदलप्रमुख आणि गुप्तचर विभागाचे संचालक यांचीही एका महिन्यात नियुक्ती केली जाऊ शकते.
२. मोदी सरकारचे पुढील लक्ष्य सैन्यदल आत्मनिर्भर करण्याकडे असेल. त्या दृष्टीने सैन्यदलाच्या संदर्भात सरकार मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
३. भाजपने घोषणापत्रात दिलेल्या आश्वासनांवरही काम चालू होणार आहे.