पाकच्या सरकारी अधिवक्त्याचे इस्लामाबाद उच्च न्यायालयात विधान !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – येथील उच्च न्यायालयात सरकारी अधिवक्त्याने एका सुनावणीच्या वेळी पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नसल्याचे म्हटले. पाकव्याप्त काश्मीरमधून अपहरण करण्यात आलेले कवी आणि पत्रकार अहमद फरहाद शाह यांचे ‘विदेशी नागरिक’ म्हणून वर्णन केले. या विधानानंतर या सरकारी अधिवक्त्यांवर टीका होत आहे.
१. फरहाद शाह यांचा खटला लढवणारे अधिवक्ता इमान मजारी हाजीर यांनी न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हे चांगली घटना नाही. सरकार काश्मीरला बाह्य भाग म्हणत आहे. यातून चांगला संदेश जात नाही.
२. अहमद फरहाद शाह जवळपास १६ दिवसांपासून बेपत्ता होते. जेव्हा त्यांचे कुटुंबीय इस्लामाबाद उच्च न्यायालयात पोचले, तेव्हा त्यांना कळवण्यात आले की, ते धिरकोट पोलिसांच्या कह्यात आहेत.
संपादकीय भूमिकाजे सत्य आहे, तेच पाकच्या सरकारी अधिवक्त्याने म्हटले आहे. लवकरच पाक सरकारलाही हेच उघडपणे सांगावे लागणार आहे ! |