खडकवासला धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा !

पुणे – खडकवासला प्रकल्पातील ४ धरणांमध्ये मिळून सध्या केवळ ५.७१ टी.एम्.सी. पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला प्रकल्पात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही ४ धरणे येतात. या ४ धरणांमध्ये मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा २९.१५ टी.एम्.सी. इतका आहे. यापैकी सध्या केवळ ५.७१ टी.एम्.सी. पाणी शिल्लक आहे. खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५.९५ टक्के इतका पाणीसाठा अल्प झाला आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा आणि अल्प दाबाने असल्याने पाण्यासाठी खासगी टँकरची मागणी वाढली आहे.