आज वैशाख कृष्ण दशमी (१.६.२०२४) या दिवशी सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांचा ९१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सुनेने त्यांच्याविषयी केलेली कविता येथे दिली आहे.
पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या चरणी त्यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
असा एक जीव भूवैकुंठात (टीप) वसे ।
श्रीविष्णूलाही जो अत्यंत प्रिय असे ।
निर्लेप, पवित्र अन् निर्मळ असे ज्यांचे मन ।
जपे सदैव ‘नारायण, नारायण’ ।। १ ।।
मायेपासून असती अलिप्त जरी ।
अपार माया करती साधकांवरी ।
ध्यानीमनी श्री गुरुच विराजती ।
उत्कट भक्ती त्यांच्या ठायी विलसते ।। २ ।।
असो बालक, युवक, युवती ।
प्रौढ असो वा असो वृद्धही ।
सर्वांवर करती समान प्रीती ।
असती सदैव साधक त्यांच्याभोवती ।। ३ ।।
गोड अन् निरागस असे ज्यांचे हास्य ।
श्री गुरूंच्या असती ज्या अंतरंगी शिष्य ।
ओळखण्यास न लागे अवधी ।
त्या आम्हा सर्वांच्या प्रिय पू. दातेआजी ।। ४ ।।
टीप – भूवैकुंठ : रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम
– सौ. ज्योती नरेंद्र दाते (पू. दातेआजींची मोठी सून, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |