Veer Savarkar : यलहंका (कर्नाटक) येथील ‘वीर सावरकर’ उड्डाणपुलाच्या नामफलकाला शाई फासणार्‍या तिघांना अटक  

नामफलकावर शाई फासलेली दिसत आहे

यलहंका (कर्नाटक) – येथील संदीप उन्नीकृष्णन् मार्गावरील ‘वीर सावरकर’ उड्डाणपुलाचा नामफलक आणि नामफलकावर असलेले वीर सावरकर यांचे चित्र यांना शाई फासल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे. लक्ष राज, निश्‍चय गौडा आणि प्रवीण अशी त्यांची नावे आहेत. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली. आरोपी कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत ?, हे अद्याप समजलेले नाही.

‘वीर सावरकरांना देण्यात येणारा सन्मान भगतसिंह यांना मिळत नाही. उड्डाणपुलाला वीर सावरकर यांच्याऐवजी भगतसिंह असे नाव द्यावे’, असा आग्रह त्यांनी धरला होता, असे सांगण्यात येते. शाई फासण्याची घटना समजताच भाजपने घटनास्थळी जाऊन आंदोलन केले.