Pakistan : पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या २ भारतियांची भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी घेतली भेट !

इस्लामाबाद – हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या अदियाला कारागृहात  असलेल्या २ भारतीय तरुणांची भारतीय उच्चायुक्तालय आणि भारतीय गृह मंत्रालय यांच्या अधिकार्‍यांनी भेट घेतली. या तरुणांना २०२० मध्ये  हेरगिरीच्या आरोपाखाली पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान भागातून अटक करण्यात आली होती. २९ वर्षीय फिरोज अहमद लोन आणि २४ वर्षीय नोआ अहमद वानी अशी या तरुणांची नावे असून ते जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. हे दोन्ही तरुण वर्ष २०१८ साली जम्मू-काश्मीरमधून बेपत्ता झाले होते. दोन्ही तरुणांनी चुकून सीमा ओलांडल्याचे समजते; मात्र पाकिस्तानी पोलिसांनी दोघांवर हेरगिरीचा आरोप करत त्यांना अटक केली होती.