Man Trapped In Plane Engine : नेदरलँडमध्ये विमानाच्या इंजिनमध्ये अडकून एकाचा मृत्यू

अ‍ॅम्स्टरडॅम (नेदरलँड्स) – येथे के.एल्.एम्. एअरलाईनच्या विमानाच्या इंजिनमध्ये अडकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हे विमान येथून डेन्मार्कला उड्डाण करणार होते, तेव्हा ही घटना घडली. विमान आस्थापनाने या घटनेची चौकशी करत असल्याचे सांगितले. नेदरलँड पोलीसही या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.