डॉ. अजय तावरे यांच्या सुरक्षेविषयी सुषमा अंधारेंनी व्यक्त केली चिंता !

डावीकडून सुषमा अंधारे, डॉ. अजय तावरे

पुणे – ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरि हळनोर यांना रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटक झाली; पण तावरे केवळ सॅम्पल पालटण्यापुरते मर्यादित नाहीत. अटक झाल्यावर त्यांनी ‘मी गप्प बसणार नाही. सगळ्यांना उघडे पाडेन’, अशी धमकी दिली. त्यांच्या या शब्दांचा गर्भितार्थ समजून घ्या. आर्यन खान प्रकरणातील साक्षीदाराचा साक्ष देण्यापूर्वीच संशयास्पद मृत्यू झाला, याची आठवण ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करून दिली.