आक्षेप घेणार्‍यांनी मनुस्मृतीच्या श्‍लोकातील एक तरी चूक दाखवावी ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

मुंबई – मनुस्मृतीतील आक्षेपार्ह लिखाणाचा आम्ही प्रचार करीत नाही; मात्र ज्या श्‍लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे, त्या श्‍लोकात एकही चूक नाही. त्यावर आक्षेप घेणार्‍यांनी या श्‍लोकातील एक तरी चूक दाखवावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या नूतन अभ्यासक्रमाच्या प्रारूपामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मनुस्मृतीमधील श्‍लोकावर शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील काही आमदार यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.

याविषयी दीपक केसरकर म्हणाले, ‘‘राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रमाच्या प्रारूपामध्ये समावेश करण्यात आलेला मनुस्मृतीचा श्‍लोक आक्षेपार्ह नाही, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रमातही हा श्‍लोक शिकवला जात आहे. हा श्‍लोक अतिशय चांगला आहे. सर्वसाधारणपणे मनुस्मृतीमधील काही ठराविक भागांवर आक्षेप आहेत. त्याविषयी आमचे काहीच म्हणणे नाही. आम्ही त्याचे समर्थन किंवा प्रचार करीत नाही.’’

‘मनुस्मृती’चे दहन केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवा ! – हिंदु जनजागृती समिती

मुंबई – तथाकथित पुरोगाम्यांनी, त्यातही सनातन धर्माच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणारे जितेंद्र आव्हाड यांनी विनाकारण सामाजिक वातावरण कलुषित करण्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी सामाजिक माध्यमातून २९ मे २०२४ या दिवशी दुपारी १२ वाजता महाड येथे मनुस्मृति हा हिंदु धर्मग्रंथ जाळण्याचे जाहीर आवाहन केले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू असतांनाही अशा प्रकारे हिंदु समाजात बहुजन आणि अभिजन असा भेदभाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न सरकारने हाणून पाडला पाहिजे. तसेच त्यांच्या या सामाजिक विद्वेष करण्याच्या वक्तव्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांना निवेदन देऊन करण्यात आली. या वेळी अधिवक्ता उमेश आठवले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नितिन गावंड, सर्वश्री अविनाश पाटील, अतीश शिंदे आणि स्वप्नील गायकर उपस्थित होते, असे हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्य पत्रकात म्हटले आहे.

राज्य सरकारच्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना मूल्ये आणि चारित्र्य शिकवणार्‍या धड्यात मनुस्मृतीतील ‘अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः। चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्यायशोबलम ।’ (अर्थ : ज्येष्ठ नागरिक, पालक आणि शिक्षक यांचा आदर अन् सेवा करणार्‍यांचे आयुष्य, यश, विद्या आणि बळ वाढते.) हा श्‍लोक घेतला आहे. या श्‍लोकातून ज्येष्ठांचा आदर, सन्मान आणि सेवा करण्यास शिकवण्याचा उद्देश असतांनाही केवळ तो ‘मनुस्मृतीतील श्‍लोक’ असल्याच्या कारणावरून आव्हाड यांनी मनुस्मृति जाळण्याचे आवाहन केले आहे.

जितेंद्र आव्हाड

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, जितेंद्र आव्हाड यांची प्रसिद्धीसाठी आणि मुंब्य्रातील मुसलमानांच्या मतांसाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची पातळी महाराष्ट्राला चांगली ठाऊक आहे. यापूर्वीही त्यांनी मुसलमानांच्या मतांसाठी ‘सेव्ह गाझा’चे टी-शर्ट घालून ‘फोटो सेशन’ (छायाचित्रीकरण) केले होते. गुजरातमध्ये चकमकीमध्ये मारली गेलेली मुंब्य्रातील आतंकवादी इशरत जंहा हिच्या नावे चालू केलेली रुग्णवाहिका सेवा लोक विसरलेले नाहीत. तसेच वर्ष २०२० मध्ये मंत्रीपदावर असतांना सत्तेचा वापर करत पोलिसांद्वारे अपहरण करून श्री. अनंत करमुसे या हिंदु कार्यकर्त्याला केलेल्या अमानुष मारहाणीची छायाचित्रे आजही समाजमाध्यमांवर आहेत. वर्ष २०१९ मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःच त्यांच्यावर २५ गुन्हे नोंद असल्याचे म्हटले आहे. सनातन धर्म आणि प्रभु श्रीराम इत्यादींच्या संदर्भात ते सातत्याने वादग्रस्त विधाने करत असतात.

मनुस्मृतीमध्ये समाजाच्या, तसेच स्त्रियांच्या विरोधातील श्‍लोकांच्या संदर्भात आक्षेप असल्याने ते मनुस्मृति जाळण्याचे आवाहन करत असतील, तर त्याच न्यायाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या ग्रंथात मुसलमानांच्या संदर्भात केलेल्या लिखाणाचा विचार ते करतील का ? केवळ दुसरे धर्म (हिंदु, जैन, बौद्ध, शीख, ख्रिस्ती आदी) त्यांच्या प्रेषिताला मानत नाहीत, म्हणून त्यांच्या निरपराध अनुयायांना काफीर ठरवून हत्या करण्याचे आदेश, या काफीरांच्या स्त्रियांवर बलात्कार करून गुलाम बनवण्याचे आदेश, तसेच त्यांची संपत्ती बळकावून ‘जिझिया’ कर लादण्याचे आदेश, त्यांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करण्याचे आदेश जितेंद्र आव्हाड यांना मान्य आहेत का ? कि ते मनुस्मृति जाळण्याचा समान नियम त्यांच्या ग्रंथांनाही लावण्याचे धाडस दाखवतील ? एकूणच विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पुन्हा मुसलमान मतांवर डोळा ठेवून त्यांचे हे हिंदुविरोधी षड्यंत्र तर नाही ना ?, अशी शंका समितीने व्यक्त केली आहे.


संपादकीय भूमिका 

इशरत जहांचे समर्थक जितेंद्र आव्हाड स्वतःला वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजतात का ?