गळा दाबून हत्या करून मृतदेह खाडीत फेकणारे दोघे अटकेत !

कीर्ती व्यास हत्या प्रकरण

कीर्ती व्यास

मुंबई – अंधेरी येथील बी-ब्लंट सलूनच्या वित्त व्यवस्थापक कीर्ती व्यास यांची हत्या केल्याप्रकरणी त्यांचे सहकारी सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सेजवानी यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. १६ मार्च २०१८ या दिवशी कामासाठी घराबाहेर पडल्यापासून त्या बेपत्ता झाल्या होत्या.

धावत्या गाडीत गळा दाबून दोघांनी त्यांची हत्या केली आणि मृतदेह वडाळा खाडीत फेकून दिला होता. अद्याप मृतदेह सापडलेला नाही.