Mandya Muslim Attack Hindu : दुचाकीला चारचाकी घासून गेल्यावरून जाब विचारल्याने मुसलमानांचे हिंदूवर आक्रमण !

मंड्या (कर्नाटक) – दुचाकी वाहनाला ‘ओव्हरटेक’ करतांना तिला घासून गेल्यामुळे दुचाकीस्वार अभिलाष यांनी संबंधित चारचाकी चालवणार्‍या मुसलमान युवकांना जाब विचारला. याचा मनात राग धरून १०-२० युवकांच्या मुसलमानांच्या एका गटाने अभिलाष यांच्यावर आक्रमण केले. मंड्या जिल्ह्यातील नागमंगल तालुक्यातील बेळ्ळुरू येथे ही घटना घडली. या वेळी मुसलमानांनी काही हिंदूंच्या घरांत घुसून त्यांनाही धमकावण्यात आले.

या आक्रमणात घायाळ झालेल्या अभिलाष यांना उपचारांसाठी आदिचुंचनगिरी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दुसरीकडे सदर मुसलमानांविरुद्ध ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी ग्रामस्थांनी बेळ्ळुरू पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. पोलीस ठाण्याचे वातावरण तणावपूर्ण बनल्याने पोलीस उपायुक्तांना तेथे येऊन ग्रामस्थांची समजूत काढावी लागली.

संपादकीय भूमिका

ही आहे भारतभरातील गावोगावच्या हिंदूंची दशा ! याविषयी कुणीच का बोलत नाही ?