यवतमाळ, २६ मे (वार्ता.) – येथील एका नागरिकाने टरबूज विकत घेऊन घरी आणले. ते थंड होण्यासाठी पाण्यात ठेवले होते; मात्र त्यातून फेस येऊ लागल्याने त्यांनी ते अंगणात ठेवले. थोड्या वेळात त्याचा मोठा स्फोट झाला. त्यामुळे घरातील भांडे पडले. याविषयी यवतमाळच्या कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी सांगितले, ‘‘टरबूज स्फोटाच्या घटना घडत असतात. शेतकरी फळ वाढीसाठी ‘ग्रोथ प्रमोटर’चा (फळाचा आकार वाढवणे) वापर करतात. क्षमतेपेक्षा आकार वाढल्याने स्फोट होतो. व्यापारी फळे पिकवण्यासाठी ‘कार्बाइड’सारखी रसायने वापरतात. त्याचे प्रमाण अधिक झाल्यासही स्फोट होतो. फळाने पाणी अधिक शोषल्यानेही फळाचा स्फोट होतो.’’ (रसायनाच्या वापरांमुळे फळाचा स्फोट होतो, तसेच ते फळ खाल्ल्यासही शारीरिक त्रास होऊ शकतो, याचा शेतकर्यांनी विचार करायला हवा. प्रशासनानेही यावर प्रतिबंध आणावा ! – संपादक)