Delhi Infants Died In Fire : देहलीत ‘बेबी केअर सेंटर’ला लागलेल्या आगीमध्ये ७ अर्भकांचा मृत्यू

नवी देहली – देहलीतील विवेक विहार परिसरातील ‘न्यू बॉर्न बेबी केअर सेंटर’ला २५ मेच्या रात्री लागलेल्या आगीत ७ नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. २६ मेला पहाटेपर्यंत आग विझवण्याचे काम चालू होते. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली. ‘शॉर्ट सर्किट’मुळे ही कआग लागल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयाला देण्यात आलेल्या विविध अनुमतींविषयी चौकशी केली जात आहे.

या ‘बेबी केअर सेंटर’मध्ये मोठ्या प्रमाणावर ‘ऑक्सिजन सिलिंडर्स’चा साठा करण्यात आला होता. आग लागल्यानंतर हे सिलिंडर्स फुटल्याने आग वेगाने पसरली. ‘बेबी केअर सेंटर’च्या शेजारील घरालाही यामुळे आग लागली. तेथे कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचेही अग्नीशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

यास उत्तरदायी असलेल्यांना फाशीची शिक्षा होण्याची मागणी जनतेने केली पाहिजे !