Shahjahampur Bus People Crushed To Death :  शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) येथे बसवर दगडाने भरलेला डंपर उलटल्याने ११ जणांचा चिरडून मृत्यू

शाहजहांपूर (उत्तरप्रदेश) – येथे झालेल्या भीषण अपघातात ११ भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण घायाळ झाले आहेत. २५ मेच्या रात्री उशिरा डंपर वाहन एका बसवर उलटल्याने हा अपघात झाला. या बसमधून जवळपास ७० भाविक प्रवास करत होते. ही बस सीतापूरहून उत्तराखंडमधील पूर्णगिरी येथे जात होती. बस एका ढाब्यावर जेवणासाठी थांबली असतांना हा अपघात घडला. दगडांनी भरलेला एका वेगवान डंपर  थेट बसवर येऊन उलटला. त्यामुळे बसमध्ये बसलेले प्रवासी चिरडले गेले.