मुंबई, २५ मे (वार्ता.) – हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्या आतापर्यंतच्या अनेक चित्रपटांविषयी मौन बाळगणारे; मात्र ‘हमारे बारह’ या चित्रपटाविषयी ‘क्यँू नफरत फैलाते हो ?’, असे मत प्रदर्शित करणारे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सडेतोड उत्तरे देऊन नागरिकांनी आव्हाड यांचा पक्षपातीपणा उघड केला आहे.
मुसलमानांची वाढती लोकसंख्या आणि लोकसंख्येचा विस्फोट या देशाच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकणारा ‘हमारे बारह’ हा चित्रपट ७ जून या दिवशी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे पोस्टर ‘एक्स’ खात्यावरून प्रदर्शित करून जितेंद्र आव्हाड यांनी ‘क्यँू नफरत फैलाते हो ? एक बता दो.. भारत की सियासत किस स्तर पे गिरने लगी है ।’ असा संदेश प्रसारित केला आहे.
त्यांच्या या संदेशाला नागरिकांनी पुढीलप्रमाणे प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नागरिकाने ‘काली’ या चित्रपटाचे कालीमाता विडी फुंकत असतांनाचे पोस्टर आणि हिंदु धर्मातील आश्रमव्यवस्थेची अपकीर्ती करणार्या ‘आश्रम’ या वेब सीरिजचे पोस्टर प्रसारित करून ‘आपणाला याविषयी आपत्ती (अडचण) नाही का ?’, असा प्रश्न स्त्रियांना समाजात सन्मान मिळावा ? आपण राजकारण करत आहात कि तुमची मानसिकता मुसलमानधार्जिणी आहे ?’’ अन्य एकाने म्हटले आहे की, ‘पीके चित्रपट कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नव्हता; पण आता ‘सियासत का स्तर गिरने लगा है ।’ हा द्वेष नाही, सत्य आहे. मागील ७० वर्षे हे बाहेर आले नव्हते’, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. अन्य एकाने ‘यामध्ये काय चुकीचे आहे, ते सांगा ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे.