ICJ ORDERS ISRAEL : आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून इस्रायलला राफा भागातील आक्रमणे थांबववण्याचा आदेश !

इस्रायलने आदेश पाळण्यास दिला नकार !

दक्षिण गाझा पट्टीतील खान युनिसमध्ये विस्थापित पॅलेस्टिनी एका उद्ध्वस्त रस्त्यावर वाहनाच्या मागे बसले आहेत

हेग (नेदरलॅड्स) – आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला गाझा पट्टीतील राफा भागामध्ये करण्यात येणारी आक्रमणे थांबवण्याचा आदेश दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला होता आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे युद्ध थांबवण्याचा आदेश देण्याची मागणी केली होती.

या याचिकेवर १५ न्यायाधिशांच्या पथकाने सुनावणी केली आणि त्यांतील १३ न्यायाधिशांनी युद्ध थांबवण्याच्या बाजूने निकाल दिला; मात्र इस्रायलने या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार नसल्याचे म्हटले आहे. ‘राफावर आक्रमणे चालूच रहातील’, असे इस्रायलचे मंत्री बेनी गँट्झ यांनी म्हटले आहे.