पुणे येथे पब, बार, रेस्टॉरंट मालक आणि कामगार यांचे आंदोलन !

 ‘अनधिकृत पबचालकांवर कारवाई करा, सरसकट नको’ अशी मागणी !

आंदोलन करणारे पब चालक आणि कर्मचारी

पुणे – येथे पब, बार, रेस्टॉरंट मालक आणि कामगार यांनी स्वत:च्या मागणीसाठी राजा बहादूर मिल येथे २४ मे या दिवशी आंदोलन केले. दोन-चार जणांच्या चुकीमुळे सर्व ‘इंडस्ट्री’ला त्रास भोगावा लागत आहे. यामुळे ५० रेस्टॉरंट जवळपास बंद केली आहेत. त्या ठिकाणी अडीच सहस्र कामगार काम करतात. या घटनेमुळे आमच्यावर परिणाम झाला आहे. त्या विरोधात आम्ही रस्त्यावर आलो. जे अनधिकृत आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याविषयी जिल्हाधिकार्‍यांना रेस्टॉरंटवर होत असलेल्या कारवाईविषयी पत्र देणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले.