घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची ‘एस्.आय्.टी.’ चौकशी होणार !

घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग

मुंबई – घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेची विशेष अन्वेषण पथकाद्वारे (एस्.आय्.टी.) चौकशी केली जाणार आहे. मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेचे सहआयुक्त लखमी गौतम यांनी याविषयीचा आदेश दिला आहे. विशेष पोलीस पथकामध्ये ६ पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या निरीक्षणाखाली प्रभारी निरीक्षक महेश तावडे हे विशेष पोलीस पथकाचे नेतृत्व करणार आहेत. घाटकोपर येथे वादळी वार्‍याने अवाढव्य होर्डिंग कोसळून त्याखाली १७ नागरिकांचा मृत्यू झाला, तर ७७ जण घायाळ झाले. ४० फूट लांबी-रूंदी इतका होर्डिंग उभारण्याला अनुमती असतांना रेल्वेप्रशासनाच्या जागेतील या होर्डिंगची लांबी-रूंदी १२० फूट इतकी होती.