Muzaffarnagar Love Jihad : मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले !

  • मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील घटना

  • वर्षभर घरी ठेवून बलात्कार करून धर्मांतरासाठी दबाव आणला !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे कामिल नावाच्या मुसलमान तरुणाने स्वतःचे नाव आणि धर्म लपवून इंस्टाग्रामवर एका हिंदु तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तरुणीला  प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला घरातील दागिने आणि पैसे घेऊन घरी येण्यास सांगितले. ही तरुणी वर्षभर त्याच्या घरी राहिली. या काळात कामिलने तिचे लैंगिक शोषण केल, तसेच कामिल आणि त्याच्या कुटुंबियांनी तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी, नमाजपठण करण्यासाठी आणि गोमांस खाण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप या तरुणीने केला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. ही तरुणी हरियाणातील जींद जिल्ह्यातील रहिवासी आहे.

कामिल याने या तरुणीला तिची अश्‍लील छायाचित्रे आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी दिली होती, तसेच तिच्या भावाला ठार मारण्याचीही धमकी दिली होती. या तरुणीने सांगितले की, वर्षभरात त्याने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला. त्याच्या कुटुंबाकडून तिला मारहाण झाली आणि तिचे शोषणही केले. ते म्हणायचे ‘मुसलमान हो, बुरखा घाला, नमाजपठण कर, उर्दू शिक.’ त्यांनी मला गोमांस खाऊ घालण्याचाही प्रयत्न केला. कामिलने माझा २ वेळा गर्भपातही करायला लावला. त्याच्या घरी आल्यावर मला कळले की, तो मुसलमान असून त्याचे नाव कामिल आहे. त्याचा एक भाऊ दुबईत, तर दुसरा भाऊ केरळमध्ये काम करतो. त्याला शिक्षा व्हावी आणि त्याला कारागृहात पाठवावे, अशी माझी इच्छा आहे. तो कधीही बाहेर येऊ नये. तो बाहेर आला, तर माझ्यासारख्या किती मुलींना तो अडकवेल आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करेल, हे सांगता येत नाही.

आरोपींच्या तावडीतून सुटका झालेल्या या तरुणीने हिंदु संघटनांशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यानंतर हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून माहिती दिली. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही ही स्थिती आहे. त्यामुळे केवळ कायदे करून अशा घटना थांबणार नाहीत, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासह दोषींवर कठोर शिक्षाही होणे आवश्यक !