झारखंडच्या मंत्र्यांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा होईपर्यंत सरकार झोपले होते का ?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर

‘झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली. ‘ईडी’ने १५ मे २०२४ या दिवशी १० घंट्यांहून अधिक वेळ त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. यापूर्वी आलमगीर यांचे खासगी सचिव संजीव लाल आणि त्यांचा नोकर जहांगीर आलम यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. जहांगीर आलम यांच्या घरातून ‘ईडी’ने ३५ कोटी रुपयांची रोकड आणि काही दागिने जप्त केले होते. हा सगळा पैसा ग्रामीण भागातील रस्ते बांधणीच्या निविदांच्या बदल्यात दलालीमधून घेतल्याचा आरोप आलमगीर यांच्यावर आहे.’ (१८.५.२०२४)