‘अक्षरांचा समुदाय म्हणजे शब्द नव्हे ! प-झ-ट-न अशी कोणतीही अक्षरे एकत्र ठेवली, तर शब्द होत नाही. शब्द होण्यासाठी त्या अक्षरांच्या समुदायाला एक अर्थ असावा लागतो. प, र्य, ट, न ही ४ अक्षरे एकत्र असतांना ‘पर्यटन’, म्हणजे ‘प्रवास’ हा अर्थ त्याला प्राप्त होतो, म्हणूनच तो एक शब्द आहे.
१. विख्यात राजनीतीज्ञ ब्लंटस्ली यांनी केलेली राष्ट्राची व्याख्या
विविध व्यवसाय असलेला आणि पात्रता असूनही समान अभिमान असणारा अन् अनुवंशिक परंपरा लाभलेला सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र होय. समान संस्कृतीमधील विशेषतः भाषा आणि रितीरिवाज यांमुळे एकवंशीयत्वाची जाणीव त्यांना ऐक्यभावाची प्रेरणा अन् इतरांपासूनची भिन्नता प्राप्त करून देते. या राष्ट्र्रीयतेचा राज्यशासनाशी काही संबंध नाही. (It is a union of masses of men of different occupations and social state in a hereditary society of common spirit. Feeling of race bound together especially by language and customs in a common civilization which gives them a sense of unity and distinction from all foreigners quite apart from the bond of the state.)
२. नसलेली राष्ट्रीय अस्मिता जागृत करणे आवश्यक !
‘हिंदु राष्ट्र्रवाद आणि राष्ट्र्रीयत्व यांविषयी तीव्र जाणीव गेल्या ७० वर्षांत वाढली नाही. याचे कारण ती वाढवावी, अशी इच्छाशक्तीच या देशाच्या राजसत्तेत नव्हती. तिचे संरक्षण, संवर्धन आणि संगोपन ज्या प्रमाणात घडेल, त्याच प्रमाणात हे राष्ट्र्र बलशाली अन् स्वत्व परिपूर्ण होईल. आमची भाषा सर्वश्रेष्ठ, संस्कृती सर्वश्रेष्ठ, आमचा धर्म सर्वश्रेष्ठ, आमचा इतिहास सर्वश्रेष्ठ, आमच्या परंपरा सर्वश्रेष्ठ अशी राष्ट्र्रीय अहंमन्यता आणि अनुकरणाचा प्रभाव यांमुळेच राष्ट्र्र मोठे होऊ शकते, हे जपान, जर्मनी, इस्रायल, इंग्लंड इत्यादी देशांनी दाखवून दिले आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, राणा प्रताप त्याचप्रमाणे आधुनिक क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, अनंत कान्हेरे, भगतसिंह, उधमसिंग, सुभाषचंद्र बोस अशा दैदीप्यमान राष्ट्र्राभिमानी विरांचे स्मरण या ठिकाणी अनाठायी ठरणार नाही.
३. जगाची भयावह स्थिती
अ. अमर्याद व्यक्तीस्वातंत्र्यवाद, गुंडगिरी, वंशवाद आणि वैवाहिक जीवनातील वैफल्य यांमुळे अमेरिका श्रीमंत, संपन्न, समर्थ अन् भक्कम राजसत्ता असूनही आतून पोखरली गेली आहे.
आ. रशियातील साम्यवादाचा प्रयोग निष्फळ ठरून त्याचे घटक स्वतंत्र होऊन स्वतःच्या दारिद्र्याला मोठ्या कष्टाने तोंड देत आहेत.
इ. दक्षिण अमेरिकेतील अनेक राज्ये अमली पदार्थांचा (ड्रग्जचा) धंदा करून उदरभरण करत आहेत. याखेरीज तिकडे भरपूर दारिद्र्य ही समस्यासुद्धा आहेच.
ई. आफ्रिकेतील देशांत एकवाक्यता नाही. सांस्कृतिक गुलामगिरीच्या दडपणाखाली ते देश भरडले जात आहेत.
उ. मुसलमान राष्ट्र्रे इस्लामी म्हणून जरी एक असली, तरी शांतता, तितिक्षा (संयम), सहिष्णुता आणि सुसंस्कृतता या गोष्टींचा त्यांच्याकडे अत्यंत अभाव आहे. यामुळेच कराची (पाकिस्तान) पेटत आहे आणि अफगाणिस्तान जळत आहे. इराण-इराकमध्ये स्नेह नाही. सर्वांच्यातच अंतर्गत धुसफूस चालू आहे आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट, म्हणजे ज्या तेलसाठ्यांच्या बळावर त्यांची मस्ती आहे, ते अनंत काळ टिकणारे नाहीत.
याखेरीज सार्या जगात बोकाळलेली गुंडगिरी, आतंकवाद, माफिया, लुटारूंच्या टोळ्या अन् त्यांची साम्राज्ये आणि यापायी सर्वत्र असुरक्षित झालेले जीवन, द्रव्याची अपरिमित लालसा, गुन्हेगारी, भयानक भ्रष्टाचार, शस्त्रास्त्रांची लयलूट, अशी सारी स्फोटक परिस्थिती आहे. त्यातच सार्या जगात बेकारीचीही समस्या आहे.’
– भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे, मुंबई
(साभार : ‘भारतीय संस्कृती’ या ग्रंथातून)
भारताचार्य सु.ग. शेवडे यांचा परिचयजगप्रसिद्ध प्रवचनकार भारताचार्य सु.ग. शेवडे (वय ८९ वर्षे) यांनी वर्ष १९७६ मध्ये इंदूरचे थोर संत नाना महाराज तराणेकर यांचा अनुग्रह घेतला. त्यांच्या आज्ञेने श्री. शेवडे यांनी शाळेतील मुख्याध्यापकपदाच्या नोकरीचे त्यागपत्र देऊन धर्मप्रसाराच्या कार्यास वाहून घेतले. त्यांनी जगभरात १३ सहस्र ५०० हून अधिक प्रवचने घेतली आहेत. त्यांनी अमेरिकेत ५५० प्रवचने घेतली आहेत. वर्ष २०१६- १७ मध्ये इंग्लंडच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये, म्हणजे तेथील संसदेला त्यांनी संबोधित करतांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराजांविषयी गेली अनेक दशके होणारा अपप्रचार श्री. सु.ग. शेवडे यांनी त्यांच्या ‘संभाजी’ या पुस्तकातून पुराव्यांनिशी खोडून काढला. यामुळे पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा होणारा अपप्रचार थांबला. सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्याशीही त्यांची ओळख होती. त्यांनी अनेक वेळा प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे. प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे हे भारताचार्य सु.ग. शेवडे यांचे पुत्र, तर आयुर्वेदाचार्य वैद्य परीक्षित शेवडे हे नातू आहेत. |