श्री. प्रकाश मराठे यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि अन्य एक दैनिक यांचा तौलनिक अभ्यास केल्यावर लक्षात आलेली सूत्रे !

‘एक दिवस माझ्या मनात विचार आला की, आपले दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि अन्य एक दैनिक यांचा तौलनिक अभ्यास करावा. त्याप्रमाणे मी रविवार, २७.८.२०२३ या दिवशीचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आणि याच दिवशीचे अन्य एक दैनिक असे २ अंक तुलनेसाठी घेतले.

यावरून दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि इतर दैनिक यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे भेद (फरक) माझ्या लक्षात आला.

श्री. प्रकाश मराठे

१. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये इतर राज्यांतील वृत्ते (बातम्या) अधिक प्रमाणात असतात. (‘दैनिक सनातन प्रभात केवळ वार्ता न छापता त्यांवर योग्य दृष्टीकोन आणि समस्यांवर उपाययोजना काय असायला हवी ? हेही छापत असते.’ – संकलक)

२. इतर दैनिकांत श्रद्धांजली, भविष्य आणि शब्दकोडे यांच्याकरता जागा दिली जाते; पण ‘सनातन प्रभात’मध्ये आपण अशी माहिती छापत नाही.

३. ‘सनातन प्रभात’मध्ये वृत्तांसह इतर विविध विषयांवर त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांचे बरचे लेख असतात. तो भाग इतर दैनिकांत पुष्कळ अल्प असतो.

‘माझ्याकडून हे ४ शब्द लिहून घेतल्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. प्रकाश रा. मराठे (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२३)