अखंड सेवारत आणि सर्व साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आंध्रप्रदेश येथील साधिका सौ. विनुता शेट्टी !

मागील १५ वर्षांपासून मी आणि विनुताताई भाषांतराची सेवा अन् विविध प्रासंगिक सेवा करत आहोत. गुरुकृपेने मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

सौ. विनुता शेट्टी

१. अखंड सेवारत रहाणे

आंध्रप्रदेशमध्ये साधकसंख्या अल्प असल्यामुळे विनुताताईंना जवळजवळ सर्वच सेवा कराव्या लागतात. भाषांतर सेवा, पंचांग सेवा, पंचांग आणि ग्रंथ यांचे संकलन करणे, ग्रंथ छपाईसंबंधित सेवा, प्रसार सेवा, सत्संग घेणे, गुरुपौर्णिमा आणि अन्य सभा यांचे नियोजन करणे, सेवाकेंद्रात स्वयंपाक करणे, अर्पण सेवा, दुसर्‍या केंद्रातील साधकांशी सेवेसंदर्भात बोलणे इत्यादी सेवा त्या न थकता आनंदाने करतात. त्या अखंड सेवारत रहातात. एवढ्या सेवा त्या करत असल्यामुळे जवळजवळ सर्व साधकांच्या त्या आधारस्तंभ झाल्या आहेत. एवढ्या सर्व सेवा करूनही विनुताताईंना कधीही कोणताही प्रश्न विचारल्यावर किंवा अडचण सांगितल्यावर त्या त्वरित त्या समस्येचे निवारण करतात.

२. ताईंना पाठदुखीचा त्रास असूनही त्या निरंतर संगणकीय सेवेत असतात आणि कधीही आपल्या शारीरिक स्थितीचे कारण सांगून सेवेत अडचण येऊ देत नाहीत.

३. यजमानांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी कठोर प्रयत्न करणे

श्री. मुरली गुडिसा

ताईंचे यजमान श्री. संतोष शेट्टी हे पूर्वी नोकरी करत असल्याने दूर रहात होते. वर्षभरात कधीतरी एखाद्या वेळी त्यांची भेट व्हायची; परंतु ताईंनी कधीही गुरुसेवेत अडचण येऊ दिली नाही. आपल्या यजमानांनी पूर्णवेळ साधना करण्यासाठी ताईंनी कठोर प्रयत्न केले. त्यांच्या यजमानांही त्यांचा साधनेत आधार वाटतो.

४. चिकाटी

मला आध्यात्मिक त्रास असल्यामुळे माझे त्यांनी सांगितलेल्या सेवेचा तिरस्कार करणे, त्यांनी सांगितलेले न ऐकणे इत्यादी स्वभावदोष प्रकट होत होते, तरीही ताई माझ्याकडून परिपूर्ण सेवा करून घेण्याचा प्रयत्न करत होत्या.

५. श्रद्धा

विनुताताईंमध्ये गुरुदेवांप्रमाणेच श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी श्रद्धा अन् भक्ती आहे. त्या मलाही त्यांचा महिमा सांगून माझ्या मनात भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतात.

अशा विविध गुण असणार्‍या सौ. विनुता शेट्टी यांना आंध्रप्रदेशात प्रसारासाठी पाठल्याबद्दल मी तीनही गुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. मुरली गुडिसा, विशाखापट्टनम्, आंध्रप्रदेश. (५.१०.२०२३)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.