Loksabha Elections 2024 : चौथ्या टप्प्यात देशभरात ६२ टक्क्यांहून अधिक मतदान !

नवी देहली – लोकसभेच्या निवडणुकांचा चौथा टप्पा १३ मे या दिवशी पार पडला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत देशभरात एकूण ६२.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे बंगालमध्ये झाले. तेथे ७५.६६ टक्के लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला, तर आंध्रप्रदेशमध्ये ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले.

चौथ्या टप्प्यात ९ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेश येथील एकूण ९६ लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झाले. यांमध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, तसेच केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर येथे मतदान पार पडले.

कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच श्रीनगरमध्ये मतदान !

विशेष म्हणजे कलम ३७० हटवल्यानंतर श्रीनगर येथे प्रथमच मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३५ टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केले. वर्ष २०१९ मध्ये केवळ १४.४३ टक्के लोकांनी मतदान केले होते, तर वर्ष २०१४ मध्ये हा आकडा २५ टक्के होता.