श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागात सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले आहेत. सुरक्षादलाची शोधमोहीम अजूनही चालू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Kulgam Encounter: 2 terrorists killed in an encounter between security forces and terrorists in #Kashmir!
Nationalists feel that in order to destroy #terrorism, India should wipe out #Pakistan, the root source of #terrorism, from the map! pic.twitter.com/0CJriqBEoV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 7, 2024
६ मेच्या रात्री उशिरा कुलगामच्या रेडवानी भागात आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाचे सैनिक घटनास्थळी पोचले. या वेळी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात चकमक चालू झाली. ही चकमक ७ मेच्या सकाळी पुन्हा चालू झाली. सुरक्षादलाने संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीच्या पूंछ जिल्ह्यातील सुरणकोट येथे सुरक्षादलाच्या वाहनावर आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. या आक्रमणात १ सैनिक हुतात्मा झाला होता.
संपादकीय भूमिकाभारताने आतंकवाद नष्ट करण्यासाठी आतंकवादाचा मूळ स्रोत असलेल्या पाकिस्तानलाच नकाशावरून पुसून टाकले पाहिजे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते ! |