British Muslim Councillor : ब्रिटनमध्ये विजयानंतर कट्टरतावादी मुसलमान नगरसेवकाने दिल्या ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा !

(अल्ला हू अकबर म्हणजे अल्ला महान आहे !)

मुसलमान नगरसेवक मोतिन अली

लंडन – इंग्लंडमधील महापालिका निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कट्टरतावादी मुसलमान नगरसेवक मोतिन अली यांनी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या. या मुसलमान नगरसेवकाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. लीड्स शहरात विजय नोंदवल्यानंतर ४२ वर्षीय मोतिन अली यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भाषण केले आणि त्यांचा विजय गाझामधील लोकांना समर्पित केला. अन्य मुसलमान उमेदवार नाहिद जोहरा गुलसीताब यांनी वॉल्सल जिंकून आपला विजय गाझाच्या लोकांना समर्पित केला.

१. ‘यूके ग्रीन पार्टी’च्या उमेदवारांनी इंग्लंडच्या महानगरपालिका निवडणुकीत गाझा युद्धाचे सूत्र उचलून धरले आणि विजय मिळवला.

२. अली हा पॅलेस्टाईनचे कट्टर समर्थक आहेत. ७ ऑक्टोबर या दिवशी हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाचे त्याने समर्थन केले होते.

३. लीड्स कौन्सिल निवडणुकीत विजय मिळाल्याने ‘यूके ग्रीन पार्टी’मधील मोतिन अली यांचे पक्षातील स्थान बळकट झाले आहे.

४. मतीन अलीच्या विजयानंतर लोकांना धक्का बसला आहे की. ‘इंग्लंडमध्ये कट्टरपंथी इस्लामचा सातत्याने उदय होत आहे’, असे त्यांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

  • मागील काही वर्षांत ब्रिटनचे होणारे इस्लामीकरण पहाता देशाचा पुढील पंतप्रधान कट्टर मुसलमान असल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !
  • मागील काही वर्षांत ब्रिटनमध्ये हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता तेथील सत्ताकेंद्र मोतिन अली यांच्यासारख्या मुसलमानांच्या हातात गेल्यास, तेथील हिंदूंची स्थिती अधिक बिकट होईल !