|
नवी देहली – भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा, तेलंगाणा येथील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह, ‘सुदर्शन न्यूज’चे संपादक सुरेश चव्हाणके आणि ‘सनातन संघ’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांचा शिरच्छेद करण्याचा कट मौलवी (मौलवी म्हणजे इस्लामचा धार्मिक नेता) अबू बकर उपाख्य महंमद सोहेल याने रचला होता. यासाठी त्याला १ कोटी रुपयांची सुपारीही देण्यात आली होती. राणा यांच्या हत्येचा कट शेवटच्या टप्प्यात असल्यची माहितीही समोर आली आहे. गुजरात पोलिसांनी ४ मे या दिवशी सुरत येथून त्याला अटक केल्यानंतर आता अधिक माहिती समोर येत आहे. हा मौलवी या हिंदुत्वनिष्ठांकडून मोठा गुन्हा होत असल्याचे मानत होता.
पोलिसांनी दिलेली माहिती
१. मौलवी अबू बकर हा नेपाळ आणि पाकिस्तान येथील आतंकवाद्यांच्या संपर्कात होता अन् तेथून शस्त्रास्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत होता. शहजाद असे नेपाळमधील आतंकवाद्याचे नाव आहे.
२. आतंकवाद्यांच्या संपर्कात रहाण्यासाठी मौलवीला ‘लाओस’ या देशाचे सिमकार्डही देण्यात आले होते, जेणेकरून त्या क्रमांकावरून संपर्क करण्यात आलेली कोणतीही माहिती भारतीय यंत्रणांना मिळणार नाही.
३. मौलवी बकर हा मूळचा नंदुरबारचा रहिवासी होता. सध्या तो सुरत येथील एका मदरशात कार्यरत होता, तसेच करजा-अम्बोली गावात मुसलमान विद्यार्थ्यांना शिकवत होता. यासह येथील एका कारखान्यात व्यवस्थापकाचे कामही करत होता.
४. मौलवी बकरच्या मनात भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना या महंमद पैगंबर यांचा अवमान करत असल्याचे भिनवण्यात आले होते. जिहादी आतंकवाद्यांकडून या हिंदुत्वनिष्ठांना ठार करण्याचे मौलवीला सांगत असतांना ‘उन्हें सीधा करो’ अशा सांकेतिक भाषेचा वापर केला जात होता.
५. मौलवीच्या भ्रमणभाषमधून मिळालेल्या माहितीनुसार तो ज्या आतंकवाद्यांच्या गटात होता, त्यामध्ये इंडोनेशियापासून व्हिएतनाम आणि कझाकस्तान येथपर्यंतचे क्रमांक सापडले आहेत.
संपादकीय भूमिकाअशांचे सखोल अन्वेषण झाल्यानंतर त्याला मृत्यदूंडाची शिक्षा दिली पाहिजे ! |