कल्याण – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १० मे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याणमध्ये येत आहेत. यामुळे पंतप्रधानांच्या स्वागतासाठी शहरातील रस्त्यांची रंगरंगोटी केली जात आहे. यानिमित्ताने २ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर गांधारी नदी पुलावर पडलेले खड्डे आणि तुटलेले रिंग यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यासाठी ‘एम्.एम्.आर्.डी.ए.’ आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे रस्त्यांची कामे चालू असली, तरी दुसरीकडे शहरातील अनेक मुख्य रस्ते पेव्हरब्लॉकचे सिद्ध करण्यात आले असल्याने ते उखडलेले, तुटलेले आहेत.
खड्ड्यांमुळे वाहनाचा वेग न्यून होत असल्याने दोन्ही बाजूला वाहतूककोंडी होत असतांना, या खड्ड्यात वाहने आदळत होती. हे काम रखडले होते.
मोदी यांच्या येण्याच्यामार्गातील खड्ड्यांना मुलामा देण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे. यानिमित्ताने का होईना खड्डे बुजत आहेत, असे नागरिकांना वाटत आहे.