शहरातील अनधिकृत, धोकादायक फलक हटवण्याचे ‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडून आवाहन !

फलक न हटवल्यास कारवाईची चेतावणी

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पी.एम्.आर्.डी.ए.) क्षेत्रातील सर्व अनधिकृत आणि धोकादायक जाहिरात फलक, आकाशचिन्ह, ‘बोर्ड’, कापडी फलक, फ्लेक्स त्वरित विज्ञापन फलक मालक, जागा मालक, विकासक, जाहिरातदार संस्था यांनी हटवावेत किंवा ‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडून ते लावण्याची अनुमती घ्यावी, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

यापूर्वी आवाहन केल्यानुसार आकाशचिन्ह, ‘बोर्ड’, कापडी फलक, फ्लेक्स धारक यांनी अनुमती घेण्यासाठी विकास परवानगी विभागाकडे एकूण १७६ प्रकरणे प्रविष्ट (दाखल) केली आहेत, प्राधिकरण कार्यक्षेत्रामध्ये होर्डिंग पडून, कोसळून दुर्घटना होणार नाही याची काळजी म्हणून महानगर नियोजनकार सुनील मरळे यांच्या अध्यक्षतेखाली आकाशचिन्ह कक्ष (कारवाई विभाग) तहसीलदार तथा कक्षप्रमुख सचिन मस्के यांच्या कारवाई पथकाने आकाशचिन्ह, ‘बोर्ड’, कापडी फलक, फ्लेक्स धारक यांच्यामध्ये जनजागृती केली.

संपादकीय भूमिका

  • जनतेला नियम पाळण्याचा धाक नसल्याचे उदाहरण !
  • असे आवाहन का करावे लागते ? अनधिकृत फलक लावेपर्यंत प्रशासन काय करत होते ?