Meteorite Falls Indo-Pak Border : राजस्थानमध्ये भारत-पाक सीमेजवळ उल्का पडल्याचा दावा !

बाँबस्फोटासारखा आवाज ऐकू आल्याची बाडमेर येथील लोकांची माहिती

बाडमेर (राजस्थान) – राज्यात भारत-पाक सीमेच्या जवळ उल्का पडल्याचा दावा केला जात आहे. सामाजिक माध्यमांमध्ये त्याचे काही व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. भारत-पाकिस्तान सीमेपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या बाडमेरमध्ये २८ एप्रिलच्या रात्री ही खगोलीय घटना घडल्याचा काही जणांचा दावा आहे. उल्का पडल्यामुळे सीमावर्ती भागात मोठा स्फोट झाल्याचेही सांगितले जात आहे. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, रात्री ९.१३ वाजण्याच्या सुमारास बाँबस्फोटासारखा आवाज ऐकू आला; मात्र याला पोलीस आणि प्रशासन यांनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

बाडमेर जिल्ह्यातील चौहाटण आणि धोरिमाण्णा येथील आकाशात एक चमकणारी वस्तू वेगाने भूमीकडे येत असल्याचे दिसले. काही सेकंदानंतर मोठा आवाज झाला. राज्यातील जालोर, पाली आणि बालोत्रा जिल्ह्यांतील काही भागांत उल्कापिंड दिसत असल्याचा दावाही केला जात आहे.