पुणे येथे रेल्वे अधिकारी लाच घेतांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या जाळ्यात !

पुणे – प्रवास करतांना रेल्वे सवलतीचे पत्र (पास) हरवल्यानंतर नवीन पत्र देण्यासाठी अर्ज केलेल्या अपंग व्यक्तीकडून १ सहस्र ८०० रुपयांची लाच स्वीकारतांना सुब्रतो या रेल्वे अधिकार्‍यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सीबीआयने) केली. या प्रकरणी अपंग व्यक्तीने सीबीआयकडे तक्रार केली होती. तक्रारदाराची ४ एप्रिल या दिवशी रेल्वेतून प्रवास करतांना सर्व कागदपत्रे असलेली पिशवी चोरीला गेली. तक्रारदाराने सवलतीचे पत्र पुन्हा मिळावे यासाठी अर्ज केला होता. ते देण्यासाठी सुब्रतो यांनी लाच मागितली होती.

संपादकीय भूमिका

लाचखोरी करणारे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांवर कठोर कारवाई केव्हा होणार ?

भ्रष्ट रेल्वे अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !