निवडणूक भरारी पथकाने मुंबईत पकडली कोट्यवधीची रोकड !

मुंबई – भांडुप येथील सोनापूर सिग्नल येथे २७ एप्रिलच्या रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एका गाडीतून कोट्यवधीची रोकड जप्त केली. निवडणूक भरारी पथकाने केलेल्या नाकाबंदीमध्ये ही गाडी सापडली. गाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आढळल्यावर पोलिसांनी ती गाडी त्वरित भांडुप पोलीस ठाण्यात नेली. पकडण्यात आलेली एकूण रक्कम साडेतीन कोटी रुपयांपर्यंत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही रोकड कोणत्या अधिकोषातून आणि कुणाच्या नावे काढली ? याविषयी आयकर विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका 

सापडलेली रक्कम एवढी असेल, तर न सापडलेली किती असेल, याचा विचारही न केलेला बरा !