पाकमध्ये आणखी एक भारतविरोधी जिहादी आतंकवादी ठार

खैबर (पाकिस्तान) – कुख्यात आतंकवादी संघटना लष्कर-ए-इस्लामचा आतंकवादी हाजी अकबर आफ्रिदी याची खैबर जिल्ह्यातील बारा भागात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या संघटनेने काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून ‘काश्मीर सोडावे अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे’, अशी धमकी दिली होती. अकबर याचे वर्ष २०१४ पासून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी संबंध होते. गेल्या २ वर्षांत जगात भारतविरोधी २१ आतंकवाद्यांना अज्ञातांकडून ठार मारण्यात आले आहे.