Poonch Headmaster Arrested : पुंछ (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांसाठी काम करणार्‍या मुख्याध्यापकाला अटक !

पाकिस्तानी पिस्तूल आणि २ चिनी हातबाँब (ग्रेनेड) जप्त  

पुंछ (जम्मू-काश्मीर) – पुंछ जिल्ह्यात आतंकवाद्यांसाठी काम करणार्‍या मुख्याध्यापकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाकिस्तानी पिस्तूल आणि २ चिनी ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत.

कमरुद्दीन असे त्याचे नाव आहे. पुंछ भागातील निवडणुकीत घातपात घडवून आणण्याचा आतंकवाद्यांचा कट होता, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

जम्मू-काश्मीरचा कितीही विकास केला, तरी तेथील जिहादी मानसिकता जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत काश्मीर भारतासाठी डोकेदुखीच असणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे !